डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना  

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना 

                                            


ही योजना फक्त (SC & ST) अनुसुचीत जाती व जमाती (आदिवासी) समाजासाठीच  आहे

मिळणारे अनुदान :

१. नविन विहीर योजना                      २.५० लाख रू २. जुनी विहीर दुरूस्ती                     ५०,०००/- रू ३. इनवेल बोअरिंग                 २०,०००/- रू ४. पंप संच                         २०,०००/- रू ५. विज जोडणी आकार                 १०,०००/- रू ६. शेत तळे प्लास्टिक आस्तरीकरण ०१ लाख रू ७. ठिबक सिंचन संच                 ५०,०००/- रू ८. तुषार सिंचन संच                 २५,०००/- रू
९. पीव्हीसी पाईप                                   ३०,०००/- रू

अपवाद : हि योजना मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यासाठी लागू नाही.

पात्रता :

१. लाभार्थी हा अनुसूचित जाती किंवा जमातीचा असावा.
२. लाभार्थीने जातीचा वैध दाखला सादर करणे आवश्यक.
३. जमिनीचा ७/१२ व ८-अ उतारा
४. लाभार्थीचे वार्षिक उत्पन्न दीड लाखाच्या आत असावे. (उत्पन्नाचा दाखला आवश्यक)
५. लाभार्थीकडे कमीतकमी ०.२० हेक्टर (अर्धा एकर) ते ६ हेक्टर पर्यंत (नवीन विहिरीसाठी ०.४० हेक्टर (एक एकर) जमीन असणे बंधनकारक

आवश्यक कागदपत्रे :

    नवीन विहीर याबाबीकरीता:

    1) सक्षम प्राधिकारी यांचेकडील अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र
    2) 7/12 व 8-अ चा उतारा
    3) तहसीलदार यांचेकडील मागील वर्षीचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र (र. रु. 1,50,000/- पर्यंत).
    4) लाभार्थीचे प्रतिज्ञापत्र.(100/500 रु च्या स्टॅम्प पेपरवर)
    5) अपंग असल्यास प्रमाणपत्र
    6) तलाठी यांचेकडील दाखला - सामाईक एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला (0.40 ते 6 हेक्टर मर्यादेत); विहीर नसल्याबाबत प्रमाणपत्र; प्रस्तावित विहीर पुर्वीपासून अस्तित्वात असलेल्या विहीरीपासून 500 फूटापेक्षा जास्त अंतरावर असलेचा दाखला ; प्रस्तावित विहीर सर्व्हे नं. नकाशा व चतु:सीमा.
    7) भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील पाणी उपलब्धतेचा दाखला.
    8) कृषि अधिकारी (विघयो) यांचे क्षेत्रीय पाहणी व शिफारसपत्र
    9) गट विकास अधिकारी यांचे शिफारसपत्र
    10) ज्या जागेवर विहीर घ्यावयाची आहे त्याजागेचा फोटो (महत्वाची खुणेसह व लाभार्थी सह).
    11) ग्रामसभेचा ठराव.

    जुनी विहीर दुरुस्ती/ इनवेल बोअरिंग याबाबीकरीता:

    1) सक्षम प्राधिकारी यांचेकडील अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र.
    2) तहसीलदार यांचेकडील मागील वर्षीचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र (र. रु. 1,50,000/- पर्यंत).
    3) जमीन धारणेचा अदयावत 7/12 दाखला व 8अ उतारा.
    4) ग्रामसभेचा ठराव.
    5) तलाठी यांचेकडील दाखला - एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला (0.20 ते 6 हेक्टर मर्यादेत); विहीर असल्याबाबत प्रमाणपत्र; प्रस्तावित विहीर सर्व्हे नं. नकाशा व चतु:सीमा.
    6) लाभार्थीचे बंधपत्र (100/500 रु च्या स्टॅम्प पेपरवर).
    7) कृषि अधिकारी (विघयो) यांचे क्षेत्रीय पाहणी व शिफारसपत्र
    8) गट विकास अधिकारी यांचे शिफारसपत्र
    9) ज्या विहीरीवर जुनी विहीर दुरुस्ती/ इनवेल बोअरिंगचे काम घ्यावयाचे आहे त्याविहिरीचा कामा सुरू होण्यापूर्वीचा फोटो (महत्वाची खुणेसह व लाभार्थी सह)
    10) इनवेल बोअरींगसाठी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील feasibility report.
    11) अपंग असल्यास प्रमाणपत्र

    शेततळ्यास अस्तरीकरण / वीज जोडणी आकार/ पंपसंच / सूक्ष्म सिंचनसंच याबाबीकरीता:

    1) सक्षम प्राधिकारी यांचेकडील अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र.
    2) तहसीलदार यांचेकडील मागील वर्षीचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र. (र. रु. 1,50,000/- पर्यंत ).
    4) जमीन धारणेचा अदयावत 7/12 दाखला व 8अ उतारा.
    5) तलाठी यांचेकडील एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला. (0.20 ते 6 हेक्टर मर्यादेत)
    6) ग्रामसभेची शिफारस/मंजूरी
    7) शेततळे अस्तरीकरण पुर्णत्वाबाबतचे हमीपत्र (100/500 रु च्या स्टॅम्प पेपरवर)
    8) काम सुरू करण्यापूर्वीचा फोटो (महत्वाची खुणेसह)
    9) विद्युत कनेक्शन व विद्युत पंपसंच नसलेबाबत हमीपत्र
    10) प्रस्तावित शेततळ्याचे मापन पुस्तिकेच्या छायांकीत प्रत व मापन पुस्तकातील मोजमापाप्रमाणे संबंधित मंडळ कृषि अधिकारी यांचेकडून अंदाजपत्रक प्रति स्वाक्षरी करुन घ्यावे.

शासन निर्णय   :

 योजना क्र .१ : बघा

योजना क्र. २ : बघा    


ऑनलाईन अर्ज : क्लिक करा